विमानामधून देखील ब्राह्मोसची यशस्वी चाचणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2018
Total Views |


पोखरन : भारताचे ब्रम्हास्त्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राह्मोस या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची आणखीन एक यशस्वी चाचणी भारतीय संरक्षण आणि संशोधन विभागाने (डीआरडीओ) घेतली आहे. विशेष म्हणजे लढाई विमानामधून ही चाचणी घेण्यात आली असून ही चाचणी देखील यशस्वी पार पडली आहे. त्यामुळे हवेतून विमानामार्फत देखील हल्ला करण्याची त्याची क्षमता सिद्ध झाली आहे.

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वतः याविषयी माहिती दिली असून ब्राह्मोसच्या या यशस्वी चाचणीसाठी डीआरडीओचे अभिनंदन केले आहे. सीतारामन यांनी याविषयी माहिती देताना आज सकाळी ८.४२ वाजता राजस्थानमधील पोखरन येथे ही चाचणी घेण्यात आल्याचे सांगितले. भारतीय वायूदलाच्या युद्ध विमानामधून ब्राह्मोसच्या सहाय्याने अचूक हल्ला करण्याची चाचणी करण्यात आली. तसेच ती यशस्वी देखील झाली. यामुळे भारताच्या संरक्षण विभागामध्ये आणखीन हा आणखीन मैलाचा दगड असून यामुळे भारतीय संरक्षण विभागाला आणखीन बळ आणि चालना मिळणार आहे, असे सीतारामन यांनी म्हटले आहे.

@@AUTHORINFO_V1@@