कडधान्य हमीभाव धोरण सरकारच्या उदासीनतेमुळेच कोसळले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2018
Total Views |

विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांचा आरोप

 

 
 
 
मुंबई : कडधान्य पिकाच्या बाबतीतले शासनाचे हमीभाव धोरण सरकारच्या उदासीनतेमुळेच कोसळले असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. तूर, सोयाबीन, उडीद यांचे दर कोसळले असल्याचा स्थगन प्रस्ताव मुंडे यांनी विधानसभेत मांडला. त्यावेळी ते बोलत होते.
 
तूर, उडीद, सोयाबीन प्रश्नी विरोधकांनी सरकारवर टिकास्त्र सोडत आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे विधानपरिषदेचे कामकाज काही काळासाठी तहकुब करण्यात आले. केवळ ४२ दिवसात ७२.७ टक्के तुरीची खरेदी शासनाला करायची आहे. मात्र शासकीय गोदामात जागा नाही. तसेच ऑनलाईन प्रक्रियेचा गोंधळदेखील सुरू असल्याचे मुंडे म्हणाले.
 
कमीत कमी तूर घ्यावी, असा सरकारचा डाव आहे. कर्नाटकात हमीभावावर ५०० रुपये बोनस देण्यात येत आहे. असे असताना राज्यात किमान हमीभावाने तरी तूर खरेदी करावी, अशी मागणी त्यांनी केली. हरभऱ्याचीही तिच परिस्थिती असून त्याचीही खरेदी केली जात नसल्याचे सांगत कडधान्याचा उत्पादकही अडचणीत आला असल्याचे मुंडे यावेळी म्हणाले.
 
@@AUTHORINFO_V1@@