आंध्रप्रदेश येथे राज्यस्तरीय बंद, विशिष्ट दर्जाची मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2018
Total Views |


 
 
 
विजयवाडा :  आंध्रप्रदेश येथे आज राज्सस्तरीय बंद पुकारण्यात आला आहे. यामागे कारण म्हणजे आंध्रप्रदेशला विशिष्ट राज्याचा दर्जा देण्यात यावा यासाठी विविध ठिकाणी प्रदर्शने करण्यात येत आहेत. तेलगुदेसम पक्षातर्फे आंध्रप्रदेशला विशिष्ट दर्जा मिळावा या मागणीसाठी विजयवाडा येथे प्रदर्शने करण्यात येत आहेत.
 
या प्रदर्शनात वायआरएस काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि इतर काही पक्षांचा देखील समावेश आहे. राष्ट्रीय महामार्ग - १६ वर प्रदर्शन करत काही पक्षातील नेत्यांनी 'रास्ता रोको' आंदोलन केले आहे. यामुळे वाहतुकीची समस्या देखील निर्माण झाली आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून संसदेत तेलगु देसम पक्षाच्या या मागणीवरुन गदारोळ होत आहे. तसेच केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव लवकरात लवकर सादर करण्यात यावा अशी मागणी देखील तेलगु देसम पक्षाने केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@