अमेरिका घालणारा चीनी मालावर नवे निर्बंध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2018
Total Views |


वॉशिंग्टन : जागतिक बाजारपेठेबरोबरच अमेरिकेन बाजारपेठेत वाढलेली चीनी मालाची घुसखोरी रोखण्यासाठी आता अमेरिका पुढे सरसावला आहे. अमेरिकन बाजारपेठेतील चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवे निर्देश तयार केल्याचे व्हाईट हाउसकडून सांगण्यात आले आहे. तसेच लवकरच हे नवे निर्देश अमेरिकन बाजारपेठेत लागू करण्यात येणार असल्याचे देखील व्हाईट हाउस स्पष्ट केले आहे.

'बाय अमेरिका, हाय अमेरिका' या ट्रम्प यांच्या घोषणेप्रमाणे अमेरिकेमध्ये निर्माण होणाऱ्या उत्पादनाला देशात आणि जागतिक स्तरावर अधिक चालना मिळावी, म्हणून ट्रम्प प्रशासन प्रयत्न करत आल्याचे व्हाईट हाउस सांगितले आहे. तसेच यासाठी म्हणून चीनी मालाचा बाजारपेठेतील शिरकाव कमी करण्यासाठी त्यावर लावण्यात येणाऱ्या आयात शुल्कात आणि इतर करांमध्ये अमेरिकेने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच येत्या काही दिवसांमध्ये ते निर्देश अमेरीकेते लागू करण्यात येणार असल्याचेही व्हाईट हाउसने म्हटले आहे.

जागतिक बाजारपेठेमध्ये आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी अमेरिका आणि चीन हे दोन कायम एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतात. अमेरिकेमध्ये ट्रम्प यांची सत्ता आल्यापासून चीनला बाजारपेठेत रोखण्यासाठी अमेरिकेने वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये थोडा दुरावा देखील आला आहे. चीनने अनेक वेळा अमेरिकेला व्यापारी युद्धाची धमकी देखील दिली आहे. परंतु अमेरिकेच्या 'ट्रम्प' प्रशासनापुढे चीनला माघार घ्यावी लागते, तसेच व्यापार युद्ध करून कोणाचाही फायदा होणार नाही, अशा समजुतीच्या स्वरात देखील चीन अमेरिकेला समजावण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु याचा देखील कसलाही फायदा अमेरिकेवर झालेला नाही.
@@AUTHORINFO_V1@@