उस्ताद बिस्मिल्ला खान यांना गुगलकडून आदरांजली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018
Total Views |


प्रसिद्ध शहनाईवादक बिस्मिल्ला खान यांची आज १०२ वी जन्मजयंती आहे. खान यांच्या जयंती निमित्त गुगुल इंडियाने देखील त्यांना आदरांजली वाहिली आहे. गुगलने आपल्या नेहमीच्या पद्धतीत एका खास डूडलच्या माध्यमातून खान यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
गुगलने आपल्या होमपेजवर खान यांच्यावर बनवण्यात आलेले एक खास डूडल अपलोड केले आहे. हे डूडल चेन्नईमध्ये राहत असलेल्या विजय कृष यांनी बनवले आहे. यामध्ये खान हे पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि टोपी घालून शहनाई वाजवत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यांच्या पाठीमागे 'google' असे लिहिण्यात आले असून त्यामागे चांदण्यांची नक्षी असलेली एक खिडकी दाखवण्यात आली आहे.

खान यांचा जन्म २१ मार्च १९१६ मध्ये बिहारमधील डुमराव येथे झाला होता. त्यांना लहानपणापासून संगीताची आणि विशेषतः शहनाई वाजवण्याची आवड होती. लहानपणापासूनच ते शहनाई वाजवत असल्यामुळे त्यामध्ये त्यांना प्राविण्य मिळत गेले होते. स्वतः मुस्लीम असून देखील ते सरस्वतीची पूजन करत असत, तसेच अनेक मंदिरांमध्ये देखील जाऊन ते शहनाई वादन करत. 'धर्म हा नेहमी प्रेम करायला शिकवतो' असे ते नेहमी म्हणत. खान यांनी आपल्या शहनाई वादनाने जगभरातील रसिकांना मोहित केले होते. यासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या तिन्ही पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. अशा थोर कलाकाराचा वयाच्या ९० व्या वाराणसी येथे २१ ऑगस्ट २००६ मध्ये मृत्यू झाला.
@@AUTHORINFO_V1@@