काँग्रेस निवडणुका जिंकण्यासाठी भारतीयांची माहिती विदेशात पाठवणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018
Total Views |

 
 
काँग्रेस पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी भारतीयांची माहिती विदेशात पाठवणार आहे का? असा प्रश्न केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी केला. एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते.
 
 
काँग्रेस पक्षाने कॅम्ब्रीज अॅनालिटीका नावाच्या अमेरिकी कंपनीला पक्षाचा सोशल मिडिया आणि मतदारांची माहिती काढण्याचे काम दिल्याचे उघडकीस आले आहे. एखाद्या विदेशी कंपनीमुळे भारतीय मतदारवर्ग प्रभावी होत असेल तर सोशल मिडियावर नक्कीच कारवाई करण्यात येईल, असे प्रसाद यांनी खडसावून सांगितले.
 
 
 
कॅम्ब्रीज अॅनालिटीका या कंपनीने नाजेरीया केनिया, ब्राझील, इंग्लंड, अमेरिका येथील निवडणुकांना प्रभावित केल्याचे अनेक आरोप आणि खटले त्या-त्या देशांत सुरु असताना काँग्रेस पक्षाने त्यांच्याशी केलेली हातमिळवणी धोक्याची भारतीय लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे, असे प्रसाद यांनी सांगितले.
 
 
काँग्रेस पक्षाने अद्याप यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्याचबरोबर राहुल गांधी यांचे ट्वीटर अकाऊंट देखील कॅम्ब्रीज अॅनालिटीका तर्फे चालविले जात असल्याचा आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. यावर देखील काँग्रेस पक्षाकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.
 
 
@@AUTHORINFO_V1@@