गोव्यात उपचारासाठी जाणाऱ्या रूग्णांचा खर्चाची प्रतिपूर्ती शासन करणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018
Total Views |



अर्थसंकल्पात सिंधुदुर्गवासियांसाठी विशेष तरतूद

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात उपचारासाठी जाणाऱ्या नागरिकांचा वैद्यकीय खर्च आता सरकारकडून उचलला जाणार आहे. गोव्यातील सरकारी वैद्यकीय रूग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रूग्णांच्या खर्चाची प्रतिपूर्ती शासन करणार असल्याची माहिती अर्थराज्य मंत्री दिपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान ते उत्तर देत होते.

सिंधुदुर्ग जिल्हा हा गोव्या जवळील जिल्हा आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अनेक रुग्ण तातडीच्या उपचारासाठी गोव्यातील वैद्यकीय रुग्णालयात जातात. पूर्वी त्या ठिकाणी नि: शुल्क उपचार केले जात होते. मात्र, आता यासाठी गोवा सरकारने शुल्क आकारणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गमधून जाणाऱ्या नारिकांची गैरसोय होत होती. या बाबीचा विचार करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात उपचारासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या उपचाराच्या शुल्काचा प्रतिपूर्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची वार्षिक मर्यादा दोन कोटी एवढी निश्चित करण्यात आली आहे.
@@AUTHORINFO_V1@@