... आता बिहारलाही हवा 'विशेष' राज्याचा दर्जा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018
Total Views |



पटना : आंध्रप्रदेशने विशेष राज्याच्या केलेल्या मागणीनंतर आता बिहार देखील विशेष राज्याचा दर्जा मिळावा, यासाठी विरोधाकांकडून मागणी करण्यात येत आहे. बिहारचे खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी यासाठी मागणी केली असून सभागृहात प्रश्नोत्तरांच्या तासादरम्यान या विशेष तातडीने चर्चा घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी लोकसभेत केली आहे. यापूर्वी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातही बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ही मागणी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे केली होती. बिहार निवडणुकीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपण त्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले होते. मात्र आता भाजप व संयुक्त जनता दलाची सत्ता बिहारमध्ये असल्यामुळे विरोधकांनी हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे.

आज सकाळीच यादव यांनी लोकसभा सचिवांकडे या संबंधी अर्ज दाखल केला असून बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा, यासाठी चर्चा घडवण्याची मागणी त्यांनी केली आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशातील अनेक राज्य वेगाने पुढे गेले आहेत. परंतु काही राज्य अजून देखील मागासलेली आहेत. त्यामध्ये बिहारचा देखील क्रमांक लागतो. बिहार आजपर्यंत अनेक गोष्टीमध्ये दुय्यम दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्याचा अजून देखील अपेक्षित विकास झालेला नाही. त्यामुळे देशात बिहार आणि इतर राज्यांमध्ये विकासाच्या दृष्टीने एक सामाजिक दरी निर्माण होऊ लागली आहे. म्हणून बिहारला देखील विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी आपल्या अर्जात केली आहे.

दरम्यान या अगोदरच आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी देशात एक नवे राजकीय नाट्य रंगले आहे. आपल्या या मागणीसाठी आंध्रप्रदेशच्या तेलगु देशम पक्षाने एनडीए सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव देखील मांडण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता बिहारचा हा नवीन मुद्दा समोर करण्याचा विरोधक प्रयत्न करून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याचे एकूणच दिसत आहे.


@@AUTHORINFO_V1@@