वृक्ष लागवड एक लोकचळचळ झाली आहे - देवेंद्र फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
'वनविकासातील लोकसहभाग अमूल्य- देवेंद्र फडणवीस'
 
 
 
मुंबई : पर्यावरणस्नेही विकासाची संकल्पना स्वीकारत महाराष्ट्रात शाश्वत विकासाची अनेक कामे हाती घेण्यात आली असून महाराष्ट्राच्या वन विकासात लोकसहभाग अमूल्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय वन दिनाचे औचित्य साधत संत तुकाराम वनग्राम पुरस्कारांचे वितरण तसेच वनसेवेत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. 
 
 
 
आता वृक्ष लागवड एक लोकचळचळ झाली आहे. वन आणि वन्यजीव संवर्धनातून रोजगार निर्मिती होत आहे. इको टुरिझममुळे वनक्षेत्रातील आणि वनालगतच्या गावातील लोकांना मोठ्याप्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होत आहेत.
 
 
 
 
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दमदार नेतृत्वाखाली वन विभागाने मागील तीन वर्षात लक्षणीय काम केल्याने महाराष्ट्र वनक्षेत्रात देशपातळीवर ४ क्षेत्रात पहिल्या स्थानावर आल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, वनेत्तरक्षेत्रात २०१५ ते २०१७ या कालावधीत २७३ चौ.कि.मीची वाढ झाली आहे. पर्यावरण संतुलनाच्या कामात वन विभागाने महत्वाचा वाटा उचलला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
 
 
 
वन वाचतील ती नागरिक आणि समाजाच्या सहभागातून हे वास्तव स्वीकारून वन विभागाने लोकसहभाग मिळवला, स्वंयसेवी संस्था, संघटना, समाजातील सर्व स्तरातील लोक एकत्र केले आणि या माध्यमातून वन विकासाच्या संकल्पामागे एक मोठी फळी निर्माण केली. हे जंगल, हे वन आपलं आहे ही भावना लोकमनात निर्माण करण्यात वन विभाग यशस्वी ठरला. यासाठी वन विभागाचे सर्व अधिकारी- कर्मचारी, संयुक्त वन व्यवस्थापन समित्या अभिनंदनास पात्र असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@