व्हॉटस्‌अॅप तरुणाईने स्मशानाचा केला स्वर्ग! - तिरोड्याच्या युवा संघटनांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018   
Total Views |

 
मोबाईलवरच्या व्हॉटस्‌अॅपने अवघ्या जगाची मान श्लेषार्थाने खाली घातली आहे... हे वेड इतके टोकाला गेले आहे की तरुणाई वडिलांच्या पार्थिवासोबत सेल्फी काढून ‘डिमाईस ऑफ माय फादर’ अशीही पोस्ट करू लागली आहे; पण अशाही हवेत तिरोड्याच्या तरुणांनी श्रमदानाने मोक्षमधामचा कायापालट केला आहे.
तिरोडा शहरातील काही युवकांनी तीन संघटनाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत स्वच्छता, हरीतक्रांतीसह आरोग्य संवर्धनासाठी मोक्षधामाचाच कायापालट करण्याचा संकल्प केला. बघता-बघता मोक्षधामाचे बागेत रूपांतर केले. माणसं मेल्यावर त्यांच्या कर्मानुसार स्वर्गात किंवा नरकांत जातात, असे मानले जाते. ता तरुणांनी आपल्या कर्माने गावच्या स्मशानभूमीचाच स्वर्ग करून टाकला.
पंतप्रधान मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ यो घोषणेला प्रतिसाद देत तिरोड्यातील युवा उत्सव समिती, श्रम शक्ती व एस.बी.सी.सी. या तीन युवा संघटनांनी एकत्र येवून मोक्षधामाच्या विकासाचा प्रण केला. मृत्यूचा मार्गही सुंदर करण्यासाठी युवकांनी येथील मोक्षधामाच्या स्वच्छतेला सुरुवात केली. क्रिकेट खेळण्यासाठी एकत्र येणारे युवक हळू-हळू कधी या विकासकार्यात गुंतले त्यांनाही कळले नाही. निधीची वाट न बघता श्रम आकणि जिद्द यांच्या भरोशावर त्यांनी मोक्षधामाचा चेहरा-मोहराच बदलला. निरनिराळ्या रंगांची फुलझाडे, अनेक प्रकारच्या प्रजातींची झाडे, निटनिटक्या पद्धतीने तयार केलेली पायवाट, हे सारे चित्र पाहून एखाद्या ही स्वर्गलोकीची बागच वाटते.
@@AUTHORINFO_V1@@