पी.जे.चे रुपांतर ब्रॉड गेजमध्ये करण्यासाठी प्रयत्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018
Total Views |

खा. रक्षाताई खडसें यांची ग्वाही


मुक्ताईनगर :
पाचोरा- जामनेर मार्गावरील पी.जे.रेल्वे मार्ग ब्रॉड गेज करुन बोदवडपर्यंत वाढवावा, या मागणीसाठी निधी मिळावा, यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही खासदार खा.रक्षाताई खडसें यांनी दिली आहे.
 
 
मागील वर्षी २६ सप्टेंबर २०१७ रोजी रेल्वे मंत्री यांना पत्र पाठवून या नॅरो गेज रेल्वे लाईनचे रूपांतर ब्रॉड गेजमध्ये करण्याकामी २०१८ च्या अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद करावी, अशी मागणी केली होती. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील बोदवड ते पाचोरा अंतर सुमारे १०२ किमी आहे. जर ही प्रस्तावित लाईन अस्तित्वात आली तर सुमारे १८ किमीचा फेरा वाचेल. भुसावळ विभाग प्रवासी व मालवाहतूकसाठी अत्यंत व्यस्त असतो.
 
 
जर ही लाईन झाली तर नागपूरकडे जाणारी मालवाहतूक डायरेक्ट होईल व मानवी श्रम व खर्च इत्यादी बचत होऊन रेल्वे प्रशासनास आर्थिक स्वरूपाचा फायदा होईल. पहूरपासून केवळ १८ किमी अंतरावरील अजिंठा लेणीसाठी रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीत लक्षणीय वाढ होईल. या मार्गावर जमिनीचे अधिग्रहण झालेले असल्याने कमी भांडवल गुंतेल व या परिसरातील आर्थिक व सामाजिक स्तर वाढेल, अशी आशा खासदार रक्षाताई खडसे यांनी व्यक्त केली. दिल्लीत त्या याबाबत पाठपुरावा करीत आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@