जम्मू कश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, २ पोलीस व १ जवान शहीद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018
Total Views |
 
 

 
 
 
 
 
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत आज दोन पोलीस कर्मचारी शहीद झाले असून यात सेनेचा एक जवान देखील शहीद झाला आहे. तर या चकमकीत सेनेला तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश मिळाले आहे. आज सकाळपासून दहशतवाद्यांनी अचानक गोळीबारास सुरुवात केली. त्यानंतर झालेल्या चकमकीत हे जवान शहीद झाले.
 
 
 
या गोळीबाराला भारतीय सैन्यांनी देखील चोख प्रतिउत्तर दिले मात्र यात एक जवान आणि दोन पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. आतापर्यंत चार दहशतवाद्यांचे शव जप्त करण्यात आले असल्याची माहिती जम्मू काश्मीरचे पोलिस महासंचालक शेष पॉल वैद यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. 
 
 
 
आज सकाळी देखील कुपवाडा येथे सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात भारतीय सेनेला यश मिळाले आहे. भारतीय सेनेकडून सुरु असलेल्या तपास अभियानात सेनेला दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर झालेल्या गोळीबारात सेनेने या ४ दहशतवाद्यांना ठार केले होते. याच चार दहशतवाद्यांचे शव जप्त करण्यात आले आहेत. 
 
@@AUTHORINFO_V1@@