पारोळ्याला २० शेतकर्‍यांना कृषीरत्न पुरस्कार प्रदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018
Total Views |
 

 विविध विकासकामाचे उद्घाटन : शेतकरी कर्जमुक्त व्हावा - चिमणराव


 
पारोळा  :
सरकार कुणाचेही असो शेतकर्‍यांना भूलथापा न देता कर्जमुक्त करा, असे प्रतिपादन माजी आ.चिमणराव पाटील यांनी ‘कृषीरत्न पुरस्कार’ वितरण व विविध विकास कामांचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
 
 
येथील बाजार समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात नोडल ऑफिसर पुणे, राजेंद्र कुमार दराडे, सभापती अमोल पाटील, जि. प.सदस्य डॉ.हर्षल माने, प्रताप पाटील, एरंडोलचे माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, नाना महाजन, अध्यक्ष शेतकरी सह.संघ चतुर पाटील जिल्हाउपनिबंधक विशाल जाधववर, चोपड्याचे माजी आ.कैलास पाटील मंचावर होते.
 
 
आ.पाटील पुढे म्हणाले की, कु.उ.बा.समितीत २ कोटी २८ लाख रुपयाचे विविध विकास कामाचे भूमिपूजन आ.पाटील यांच्या हस्ते झाले त्यात दोन जुने लिलाव नवीन गोदामात रूपांतर, शिदोरी गृह, पाणी टँक, सिमेंट कॉंक्रिट रस्ता लिलाव शेड प्लांट फॉर्म्युला, प्रोफ्लेक्स शीट बसविणे ह्या कामाचा समावेश आहे. विशेष म्हणजे बँकांकडून एक रुपया न घेता केली आहेत.८७ लाख रुपयांचे बाजार समितीला अनुदान मिळणार असल्याचे आ.पाटील यांनी सांगितले. सभापती अमोल पाटील यांनी प्रास्तविक केले.
 
 

यांना मिळाला कृषिरत्न पुरस्कार - तुषार संभाजी निकम,भूषण नाना महाजन,मधुकर कौतिक पाटील,हिरालाल गंगाराम पाटील,विनोद चुडामण पाटील, सौ.मनीषा संजय पाटील, गुमानसिंग राजधर पाटील, मुकेश पाटील, निंबा गढरी, प्रल्हाद पाटील, भास्कर पाटील, प्रमोद पाटील,विकास पाटील, भूषण पाटील, यशवंत पाटील, सचिन पाटील, वसंत पाटील, निंबा पाटील, चैत्राम पाटील यांना कृषिरत्न पुरस्कार देण्यात आला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही विक्रमी उत्पादन घेणार्‍यांचे कौतुक व्हावे तसेच शेतकर्‍यांना प्रेरणा मिळावी यासाठी बाजार समिती तर्फे कृषिरत्न पुरस्काराचे वितरण झालेे. शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रा.आर.बी.पाटील, शहरप्रमुख बापू मिस्तरी,पोपट नाईक, एरंडोलचे माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, किशोर निंबाळकर पोलीस निरीक्षक विलास सोनवणे, राजू कासार, विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन प्रा.वसुंधरा लांडगे यांनी केले. आभार प्रा.आर बी पाटील यांनी मानले.

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@