मनपातील सत्ताधारी खाविआचे सचिव राजकुमार अडवाणींचा राजीनामा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018
Total Views |

 
जळगाव, २१ मार्च :
माजी नगरसेवक राजकुमार अडवाणी यांनी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास आंदोलनस्थळी भेट देऊन गाळेधारकांच्या हितासाठी खान्देश विकास आघाडीच्या सचिवपदाचा राजीनामा देत जाहीर केले. दुपारपर्यंत त्यावर त्यांनी अंमलही केला.
 
 
महापालिकेत आघाडी सत्ताधारी आहे. गरज भासल्यास मनपा नगरसेवकांनीही आपल्या पदांचे राजीनामे देऊन गाळेधारकांना पाठिंबा जाहीर करावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. अडवाणी यांचे राजीनामा पत्र दुपारी सोशल मीडियावर व्हायरल झाले.
 
 
भाजप नगरसेविका कंचन बालाणींची राजीनाम्याची घोषणा
भाजपच्या कंचन प्रकाश बालाणी यांनी धरणे आंदोलनास पाठींबा दिला. २३ रोजीच्या महासभेत गाळेधारकांच्या हिताविरूध्द प्रस्ताव केला गेल्यास त्यास तीव्र विरोध करुन राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
 
 
भाजप नगरसेवकांची हजेरी हवी
सुनील माळी यांनी भाजप नेत्यांचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले असता, गाळेधारकांच्या विरोधात कोणताही ठराव आल्यास त्याला भाजपच्या सर्व नगरसेवकांनी महासभेत उपस्थित राहून विरोध केला पाहिजे, अशी मागणी गाळेधारकांनी केली. त्यास माळी यांनी होकार दिला.
@@AUTHORINFO_V1@@