जम्मू काश्मीर येथे चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्थान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018
Total Views |

 
 
कुपवाडा : जम्मू काश्मीरच्या कुपवाडा येथे सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात भारतीय सेनेला यश मिळाले आहे. भारतीय सेनेकडून सुरु असलेल्या तपास अभियानात सेनेला दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर झालेल्या गोळीबारात सेनेने या ४ दहशतवाद्यांना ठार केले.
 
मंगळवारी सकाळी सेनेला या दहशतवाद्यांबद्दल माहिती मिळाली. त्यानुसार सेनेने कुपवाडा आणि आसपासच्या भागात तपास अभियान राबविले. त्यानंतर दहशतवाद्यांनी सेनेवर गोळीबार केला, याला प्रत्युत्तर देत सेनेने केलेल्या गोळीबाराने या दहशतवाद्यांना कंठस्थान घातले.
 
गेल्या वर्षभरात सुरक्षा रक्षकांनी १९० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. यातील ८० दहशतवादी हे स्थानिक असून ११० दहशतवादी हे पाकिस्तानी होते. या वर्षी देखील वर्षाच्या सुरुवाती पासूनच जम्मू काश्मीर येथे पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. तसेच अनेक तपास अभियानांमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांची माहिती जवानांना मिळत आहे.
@@AUTHORINFO_V1@@