जामनेर नपा निवडणूक : लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी साधनाताई, अंजली पवार यांच्यात लढत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018
Total Views |
 
 

 
जामनेर :
जामनेरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी सरळ लढत होत असून विद्यमान नगराध्यक्षा भाजपच्या सौ.साधनाताई महाजन आणि राष्ट्रवादीच्या अंजली पवार यांच्यात ती रंगणार आहे. आजच्या छाननीमध्ये एकूण १४७ अर्ज विविध कारणास्तव बाद झाले आहेत, तर नगराध्यक्षपदासाठी वरील दोघांचाच आधिकारिक स्वरूपात एबी फार्म असल्यामुळे सातपैकी दोघेच उमेदवार मैदानात आहेत, तर २४ नगरसेवकपदासाठी ८१ उमेदवार मैदानात आहेत. येत्या २६ मार्च (सोमवार)पर्यंत माघारीची अखेरची मुदत असल्याने किती उमेदवारांची माघार होते,याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
 
 
उमेदवार यादीमधे भाजपने छाननीच्या दिवशी एक उमेदवार बदलला आहे. वार्डक्रमांक ५ अ मधील मुश्ताकअली सैय्यद करीम यांच्या जागेवर शेख नाजीम शेख वजीर यांना तिकीट दिले आहे, नावामधे फेरफार असल्याने उमेदवार ऐनवेळी बदलावा लागल्याचा भाजपने दावा केला आहे, तर आता छाननीनंतर एकूण २२८ उमेदवारांपैकी आता ८१ उमेदवार नगरसेवक पदासाठी मैदानात आहेत.
 
मंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त निधी आणून सर्वत्र विकासकामे सुरु केली आहे. अधिकाधिक सोयीसुविधा पुरविण्याचे काम सुरु आहे. सोनबर्डी विकास, २४ तास पाणीपुरवठा योजना, जलशुद्धीकरण प्रकल्प, स्वच्छ सुंदर शहर बनविण्याकडे वाटचाल सुरु आहे.
 

२ जागा बिनविरोध?...: वार्ड क्रमांक चार ब मधील कॉंग्रेस आघाडीच्या सैय्यद परवीनबी शेख मजहरअली यांचे जात वैधताप्रमाणपत्र वेळेत दाखल झाले नसल्याने भाजपच्या बबुसाबी शेख यासीन यांची बिनविरोध निवड शक्य आहे, वार्ड पाच ब मधीलही कॉंग्रेस आघाडीच्या शेख शबानाबी जहीर यांचेही जात वैधताप्रमाणपत्र वेळेत सादर झाले नसल्याने भाजपच्या सुरैय्याबानो अजीमशेख यांच्या बिनविरोध निवडीची चर्चा होती. - सौ.साधनाताई महाजन विद्यमान नगराध्यक्ष आणि भाजपा उमेदवार

@@AUTHORINFO_V1@@