महापालिकेच्या २७ हजार कोटीच्या अर्थसंकल्पाला सभागृहाची मंजुरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018
Total Views |

११.२५ वाजता मिळाली मंजुरी
काँग्रेस, राष्ट्रवादी, सपाचा सभात्याग

 
 
 
 
मुंबई : सोयी सुविधांवर भर देणारा, पारदर्शकता आणि वास्तविकतेला धरून असणारा मुंबई महानगर पालिकेचा २०१८-१९ या वर्षासाठीचा २७२५८ कोटीच्या खर्चाला सात कोटी शिलकीचा अर्थसंकल्प काल रात्री ११ वाजून २५ मी. सभागृहात मंजूर करण्यात आला. चार दिवसांपासून पालिका सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होती त्यामध्ये १३५ सदस्यांनी सहभाग घेतला. दरम्यान अर्थसंकल्प मंजूर करत असताना काँग्रेस, राष्ट्रवादी, सपा या पक्षांनी सभात्याग केला.
 
या तरतूदींची येत्या १ एप्रिलपासून अंमलबजावणी केली जाईल. अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नसली तरी अप्रत्यक्षरित्या काही सेवांचे शुल्क वाढवण्यात आले आहे. गेल्या वर्षी ३६ हजार कोटींचा अर्थसंकल्प होता परंतु त्यामधील ५४ टक्केच रक्कम खर्च झाली होती. यंदाच्या अर्थसंकल्प मध्ये ८७ निधी खर्च होणार आहे.
 
यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, आरोग्य, रस्ते नद्यांचा विकास यावर भर दिला आहे. तसेच विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी २६६५ कोटींची तरतूद केली आहे. मुंबईत वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांकरिता वाहनतळ उभारण्यात येणार आहे. कामासाठी यंदा अर्थसंकल्पात १२०२ कोटींची तरतूद केली आहे. दहिसर, नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सल्लागारांवर २५ लाख खर्च करण्यात येणार असून मिठी नदीमध्ये मल सोडण्यात येते त्यावर प्रकिया करून ते नदीत सोडण्यात येणार आहे. गेल्यावर्षी २९ आगस्टला मुसळधार पाऊस झाला होता त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले होते तसेच या पावसामुळे काही जणांचा मृत्यू झाला होता. १२५ ठिकाणे आहेत जिथे पाणी साचते त्यापैकी 50 ठिकाण यंदा कमी करण्यासाठी पालिकेचे काम सुरू आहे. मुंबईत कचरा वर्गीकरण सुरू केल्यानंतर एकाच ट्रक मध्ये हा कचरा नेला जात होता परंतु ओला कचरा साठी एक आणि सुक्या कचऱ्यासाठी एक कप्पा करण्यात येणार आहे . त्यासोबतच इवेस्ट साठी वेगळा कप्पा करण्यात येणार आहे.
 
 
स्वच्छ भारत अभियान, देवनार येथील कचऱ्यापासून उर्जा निर्मिती प्रकल्प, मुलुंड क्षेपणभूमीवर बायो मायनिंग प्रक्रिया. तसेच तलाव व नद्यांचे सुशोभिरण करण्यावर अर्थसंकल्पात भर दिला आहे. धूर फवारणी मुळे दम्याचे रुग्ण वाढतात असे लक्षात आले होते त्यामुळे जेथे मच्छरांचे उत्पत्ती केंद्र आहे तिथेच धूर फवारणी करण्यात येणार आहे.
 
 
प्लास्टिक मुक्ती साठी पालिका पुढाकार घेणार असून त्यासाठी नागरिकांनाही प्रोत्साहन देणार आहे. येत्या दोन वर्षात १२ जलतरण तलाव बांधले जाणार आहे. त्यातील ८ जलतरण तलावाचे काम प्रगती पथावर असून उर्वरित लवकरच पूर्ण होणार आहेत. प्रायोगिक तत्वावर नाल्यांवर आच्छादन लावले जाणार आहे.
 
परीक्षा अवघड नाही, मुलेच जास्त हुशार
सफाई कामगारांसाठी पालिकेने घेतलेली परीक्षा खूप अवघड होती असे सांगण्यात आहे परंतु गेल्या वर्षी परीक्षा घेतली तेव्हा १३०० जागांसाठी ६००० मुलांना १०० मार्क मिळाले होते. त्यावरून वाद झाला होता. यंदा १३०० जागांसाठी ३ लाख लोकांनी अर्ज भरले त्यातील १ लाख पास झाले. ८० ते ९० मार्क मिळाले असणारे १५०० उमेदवार असून परीक्षा अवघड नव्हती तर मुलेच जास्त हुशार झाली आहेत असे आयुक्त अजोय मेहता म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@