राज बब्बर यांच्या राजीनाम्यामुळे उ.प्र. काँग्रेसमध्ये खळबळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018
Total Views |

 
 
लखनऊ : एकेकाळचे प्रसिद्ध अभिनेते आणि उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. फुलपूर आणि गोरखपूर लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसची कामगिरी बघता त्यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. फुलपूर आणि गोरखपूर लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसची कामगिरी निराशाजनक होती.
 
 
 
 
 
राज बब्बर यांच्या राजीनाम्यानंतर जतिन प्रसाद, राजेश मिश्रा किंवा लातेशपती त्रिपाठी या काँग्रेस नेत्यांच्या नावाविषयी चर्चा करण्यात येत आहे. काल राज बब्बर यांनी त्यांच्या एका ट्वीटच्या माध्यमातून राजीनाम्याचे संकेत दिले होते.
 
 
उत्तर प्रदेश येथे काँग्रेसची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ८० पैकी केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले होते, तर २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत सपासोबत युती केल्यानंतर देखील काँग्रेसला केवळ ७ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसची निराशाजनक कामगिरी बघता हा निर्णय घेण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@