नालेसफाईच्या कामावर नजर ठेवण्यासाठी समिती नेमावी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
मुंबई : नालेसफाईच्या कामावर नजर ठेवण्यासाठी नागरिक आणि नगरसेवकांची समिती नेमावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक जगदीश ओझा यांनी केली.
 
मुंबईत छोटेमोठे नाले आहेत. नाले सफाईच्या कामात अत्यंत दिरंगाई केली जात आहे. नााले सफाई करणाऱ्या कंत्राटदारावर वचक बसावा, म्हणून पाहणी नागरिक याची समिती नेमावी असेही ते म्हणाले.
 
'एसआरए'च्या इमारती मधील नागरिकांना शुल्कात सवलत दिली जाते. मुंबईत ३० ते ४० हजार इमारती आहेत ज्यांना ओसी मिळाली नाही त्यामुळे त्यांना दुप्पट दर आकारून पाणी पुरवठा केले जाते. परंतु याला जबाबदार विकासक असून रहिवशांची चुकी नाही. त्यामुळे त्यांना एसआरएप्रमाणे शुल्कात सवलत दिली जावी. असे ते म्हणाले.
 
८ ते १० वर्षांपासून पालिकेच्या इमारती बांधण्यात आल्या आहेत परंतु त्याचा वापर होत नाही. त्यामध्ये अनेकदा आरोग्य केंद्र, समाजकल्याण केंद्रसाठी आरक्षित करण्यात येते परंतु त्याचा वापर होत नाही. गरीब नागरिकांना त्याचा फायदा मिळत नाही अशा इमारती लवकरात लवकर सुरू करण्यात याव्यात, असे ते म्हणाले. तसेच उद्यानाच्या देखभालीसाठी पालिका कोट्यवधीचा कंत्राटदारावर खर्च करते परंतु उद्यानाची अवस्था बिकट आहे असे निदर्शनास आणत हे उद्यान देखभालीसाठी पूर्वीप्रमाणे संस्थांना काम द्यावे, असे त्यांनी सांगितले. तर पालिकेच्या विद्यार्थ्यांना खेळाचे मैदान आणि प्रशिक्षक द्यावा त्यामुळे त्याचा खेळाला वाव मिळेल, असेही ओझा म्हणाले.
 
@@AUTHORINFO_V1@@