एका कवि पुत्राचं विनम्र निवेदन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018
Total Views |
 
 
 
मुंबई :  आज जागतिक कविता दिन आहे. आणि या दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांचे लाडके अमिताभ बच्चन यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक विनम्र निवेदन केले आहे. कवितेसाठी केवळ असा एकच दिवस का द्यायचा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
 
 
 
 
ते म्हणतात,
 
केवल एक दिवस देते हो कवि, कविता के लिए ,
आश्चर्य होता होगा सभी कवि दिग्गजों के लिए ;
जानते नहीं हो तुम विश्व के आचरण को
जीव जीवनी, प्रति क्षण कविता होती है सर्व प्रिये !
 
"केवळ एकच दिवस का कवितेसाठी द्यायचा ? जीवनातील प्रत्येक क्षणात कविता आहे." असा अत्यंत सुंदर भाव त्यांनी या स्वरचित कवितेतून मांडला आहे. तसेच त्याखाली त्यांनी 'एका कवि पुत्राचं विनम्र निवेदन" असं लिहीलं आहे. अमिताभ बच्चन यांची स्वत: हिंदी भाषेवर उत्तम पकड असून त्यांच्या रचना देखील अतिशय सुंदर असतात. 
 
अमिताभ बच्चन यांचे पिता हरिवंयराय बच्चन अत्यंत प्रसिद्ध कवि होते. ते अजरामर कवि आहेत. त्यांच्या अनेक कविता गेल्या अनेक पिढ्या प्रसिद्ध आहेत. यामध्ये त्यांच्या मधुशाला, अग्निपथ, जो बीत गयी सो बात गयी अशा अनेक रचना जगप्रसिद्ध आहेत. आयुष्याच्या प्रत्येक क्षणात कविता असताना त्यासाठी केवळ एकच दिवस का? असा अत्यंत सुंदर विचार अमिताभ बच्चन यांनी आपल्या या कवितेच्या माध्यमातून दिला आहे. जागतिक कविता दिनाच्या दिवशी याहून सुंदर रचना असेल ती काय?
@@AUTHORINFO_V1@@