काबुलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात २६ नागरिकांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
अफगाणिस्तान : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात २६ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची बातमी सध्या मिळत आहे. या हल्ल्यात १८ नागरिक जखमी झाले असून जखमी नागरिकांवर त्वरित उपचार सुरु करण्यात आले आहेत. हा आत्मघाती बॉम्बहल्ला काबुल विद्यापीठाच्या पुढे झाला असून या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी तसेच मृत्यूमुखी पडले आहे.
 
 
 
 
बॉम्बहल्ला झाल्यावर घटनास्थळी लगेच मदतकार्य सुरु करण्यात आले सध्या या जागेवर चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. आजूबाजूचे रस्ते तसेच मोक्याचे ठिकाण बंद करण्यात आले आहेत. घटनास्थळी परिस्थितीचा अंदाज घेत हा हल्ला कोणाकडून करण्यात आला सध्या याचा तपास तेथील पोलिसांकडून घेतला जात.
 
 
 
काही महिन्यांपूर्वी देखील काबुलमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली होती. या स्फोटात ४० जणांचा मृत्यू झाला होता. यात ११० नागरिक जखमी झाले होते. भारतीय दूतावासच्या कार्यालयाजवळ हा बॉम्ब स्फोट घडवून आणण्यात आला होता. या स्फोटाची जबाबदारी तालिबानने घेतली होती. मात्र आजच्या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतली नसल्याने याचा शोध लावण्यात येत आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@