शिक्षकांच्या छळामुळे १५ वर्षीय मुलीची आत्महत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018
Total Views |
 
 
 
दिल्ली : दिल्लीच्या नॉएडा येथे एका १५ वर्षीय मुलीनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. १५ वर्षीय विद्यार्थिनीने शिक्षकांनी केलेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. ननॉएडाच्या मयूर विहार येथील ही घटना आहे. गच्ची वरून उडी मारुन तिने आत्महत्या केली असल्याचे म्हटले जात आहे.
 
शिक्षकांच्या छळामुळे तिने आत्महत्या केली असल्याचा आरोप तिच्या वडीलांनी केला आहे. "माझ्या मुलीला तिच्या शिक्षकांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्ष केला अशी तक्रार घेवून ती माझ्याकडे आली होती. मी स्वत: एक शिक्षक असल्यामुळे तिला समजावले की त्यांने असे मुद्दाम केले नसेल, काही चूक झाली असेल. मात्र ती खूप घाबरलेली होती. तिचे शिक्षक तिला नापास करतील याची तिला भिती होती, आणि तसेच झाले." अशी माहिती मुलीच्या वडीलांनी माध्यमांना दिली.
 
नॉएडाच्या अॅकॉन पब्लिक स्कूल या शाळेत इयत्ता ९वीची ती विद्यार्थिनी होती. डॉक्टरांनी तिला वाचवण्याचे खूप प्रयत्न केले, मात्र अखेर तिचा मृत्यु झाला. शवविच्छेदनानंतर परिस्थिती आणखी स्पष्ट होईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@