‘मोहिनी’च्या परिवाराला ‘शताब्दीस्मृती’ची भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018
Total Views |

जनार्दन स्वामीजींचा शब्द भक्तांच्या दानशुरत्वामुळे प्रत्यक्षात...
आ.हरीभाऊ जावळे यांनी इलर्निंगसाठी दिले पाच लाख

 

फैजपूर ता. यावल :
येथील नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शतकपूर्ती महोत्सवाप्रसंगी एका समारंभात सहावीतील विद्यार्थिनी मोहिनी चव्हाण हिने सुंदर गीतनृत्य सादर केले होते. यावेळी तिची या महोत्सव समितीचे अध्यक्ष महामंडलेश्वर सतपंथरत्न श्री जनार्दन हरिजी महाराजांनी आस्थापूर्वक चौकशी केली असता ती एका बेघर लोहार कुटुंबातील असल्याचे समोर आले आणि क्षणाचाही विलंब न करता महाराजांनी मोहिनीला ‘शताब्दी स्मृती’घर देण्याचा संकल्प केला आणि हा संकल्प वर्षभरात पूर्णत्वास नेत गुढी पाडव्याच्या नूतन वर्षाआरंभ दिनी या ‘शताब्दी स्मृती’ चे समर्पण महामंडलेश्वरानी केले आहे. यासाठी तब्बल ८ लाख खर्च झाला आहे, मोहिनी या शाळेची विद्यार्थिनी आहे तसेच महाराजही या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. लोकसहभागातून असे अलौकिक समाजकार्य घडू शकते याचे मूर्तिमंत उदाहरणं म्हणजेच शताब्दी स्मृती समर्पण निमित्त ठरले फक्त शाळेचा शताब्दी वर्ष सोहळा आणि महामंडलेश्वराचा दृढ संकल्प व त्यास पाठबळ देणारी जिवाभावाची माणसं.
 
 
जनार्दन हरी महाराज साक्षात परमेश्वरच : मोहिनी चव्हाण
येथील हुतात्मा बापू वाणी चौकातील झोपडी वजा तंबूत राहणारे निराधार लोहार (पांचाळ) कुटुंबातील मोहिनी चव्हाण म्हणाली की, शाळेच्या स्मृती व महाराजांचे कृपा सानिध्य जीवनभर स्मृतीला उजाळा देत राहतील, असे वाटले सुद्धा नाही, मात्र ‘असावा सुंदर चॉकलेटचा बांगला’ या बालगाण्यासम घराचे स्वप्न होते, ते शाळा आणि महाराजांमुळे प्रत्यक्षात साकारले याचा परमानंद आज होत आहे. जनार्दन महाराज आमच्यासाठी साक्षात परमेश्वरच आहे, अशी प्रतिक्रिया मोहिनेने ‘तरुण भारत’ ने साधलेल्या संवादात व्यक्त केली. मोहिनी व तिच्या आईवडिलांचे डोळे आनंदाश्रू डबडबलेे होते व मन गहिवरून आले होते. परिसरात असे अनेक गरजू परिवार आहेत, त्यांनाही सावलीची आवश्यकता आहे., याची केव्हातरी,कोणीतरी सुरुवात करावी म्हणून आपण हा क केलेला उपक्रम आहे. आपणही या देश,समाजासाठी देणे लागतो, आपली ही काही कर्म करण्याची भूमिका हा खरा धर्म आहे. मी जरी सतपंथ मंदिराचा गादीपती असलो तरी फैजपूर ही माझी कर्मभूमी आहे. ही शाळा माझी आहे, त्यांचे अगणित ऋण आहे, महोत्सवाच्या निमित्ताने शाळेच्या सर्वागीण विकासाचा संकल्प केला त्यास शहरवासीयांनी,माजी शिक्षक व विद्यार्थी यांनी मोठा हातभार लावला. गरजूंना शिक्षण घेता यावे म्हणून शताब्दी वर्ष निमित्ताने लोकसहभागातून शाळेचा जीर्णोद्धार कार्य केले याच उपक्रमात मोहिनीच्या कलागुणांनी माझ्या कार्याला श्रीगणेशाची मोहिनी घातली.
 
इलर्निंगसाठी ५ लाखाचा निधी
आ.हरिभाऊ जावळे यांनी हायस्कूलच्या इलर्निंगसाठी ५ लाखाचा निधी व शताब्दी स्मृती भवनासाठी ५१ हजाराचा निधी धनादेशाद्वारे महामंडलेश्वर जनार्दन महाराजांकडे सुपूर्द केला. स्वरूपानंदजी महाराज (डोंगरकठोरा), बाबा शास्त्री मानेकर (सावदा), चेअरमन नरेंद्र नारखेडे, उपनगराध्यक्ष कलिमखान मण्यार, मिलिंद वाघुळदे, नगरसेवक देवेंद्र साळी, हिराभाऊ चौधरी, विलास चौधरी, सुनील लक्ष्मण वाढे, मुख्याध्यापक आर.एल.आगळे आदी उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@