२७ वर्षांपासून फरार असलेल्या खलिस्तान संघटनेच्या दहशतवाद्याला अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2018
Total Views |


चंडीगड :
तब्बल २७ वर्ष पोलिसांना गुंगारा देणारा खलिस्तान संघटनेचा म्होरक्या रणजीत सिंग उर्फ राणा याला पंजाब पोलिसांनी काल रात्री अटक केली आहे. आपल्या मूळ गावी एका लग्नात सहभागी होण्यासाठी वेष पालटून राणा आला असताना पोलिसांनी त्याला अटक केली.
 
पंजाब पोलीसचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप कुमार शर्मा यांनी याविषयी माहिती देत सांगितले की, राणा गेल्या २७ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस राणाचा शोध घेत होते. काही लोक राणा मृत झाल्याचे समजत होते. परंतु तो वेष पालटून राहत असल्याच्या बातम्या देखील मिळवत होत्या. त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान सोमवारी राणा हा आपल्या गावी नूरपुर जट्‌टां येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
 
पोलिसांनी अटक केल्यानंतर राणा देखील आपला गुन्हा कबुल केला असून आपले अन्य साथीदार सतनाम सिंग सत्ता, निवासी पलटावा आणि गुरलाल सिंग हे तीन जण सध्या हयात नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. याच बरोबर जबाब नोंदवून दिला आहे. त्यामुळे पोलीस त्याला यानंतर न्यायालयासमोर हजर करणार आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@