गिरीश महाजन यांनी घेतली अण्णा हजारे यांची भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2018
Total Views |




अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी सत्याग्रह करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी सरकार अत्यंत संवेदनशील असून शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी सरकार सर्व प्रकारे प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन महाजन यांनी केले आहे.
 
काल रात्री उशिरा अहमदनगर येथे जाऊन महाजन यांनी अण्णांची भेट घेतली. या भेटीमध्ये शेतकरी प्रश्नांवर चर्चा करून त्यावर योग्य तोडगा काढण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून सरकारने कर्जमाफी घोषित केली आहे. तसेच शेतकऱ्याच्या विकासासाठी गेल्या चार वर्षात विविध शेतीहिताच्या योजना सुरु केल्या आहे. त्यामुळे सरकार शेतकरी प्रश्नांसंबंधी अत्यंत संवेदनशील आहे, असे त्यांनी म्हटले.

 
याच बरोबर या भेटीनंतर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना, सरकार या गोष्टीवर निश्चितच तोडगा काढेल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्याच बरोबर राज्यासमोर सध्या अनेक समस्या आहेत, त्यांचादेखील विचार सरकारला प्राधान्याने करणे गरजेचे आहे, म्हणून शेतकरी प्रश्नांना थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे. परंतु शेतकऱ्यांच्या या समस्येवर नक्कीच उपाय केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@