कर्तव्यदक्ष रेल्वे कर्मचाऱ्याचा गौरव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2018
Total Views |
 
कर्तव्यदक्ष रेल्वे कर्मचाऱ्याचा  गौरव
 
भुसावळ, 20 मार्च
रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या दोन कर्मचाऱ्याचा सतर्कतेने अपघात टळला होता. या कर्तव्यदक्ष कामगारांना डिआरएमयांच्याहस्ते गौरविण्यात आले.
 
23 जानेवारी रोजी भुसावळ - बडनेरा स्थानका दरम्यान लोको निरीक्षक एस.डी.बोरनारे आणि लोको पायलट एस.पी.खैरे यांना खामखेड - मलकापूर स्थानका दरम्यान अप मार्गावर मुंबईकडे जाणा­या कलंबोली मालगाडी च्या एका वॅगन मध्ये बर्निग हॉट एक्सल दिसून आले. गाडी चालकांनी लागलीच वॉकी- टॉकी वर सदर मालगाडी चालकास गाडी थांबविण्यास सांगीतले.
 
मालगाडी कंलबोली च्या चालकाने त्वरीत गाडी थांबवून बर्निंग हॉट एक्सल वैगन ची पाहणी करून अधिक नुकसान होण्यापुर्वी यागाडीला सावधरीत्या बोदवड स्थानकात आणण्यात आले. येथे खराब वॅगनला गाडीपासून दुर करण्यात आले. अशा प्रकारे बोरनारे आणि खैरे यांच्या सतर्कतेमुळे रेल्वे गाडीचा मोठा अपघात टाळता आला.या कर्तव्यदक्षतेबद्दल डीआरएम आर.के.यादव यांच्या हस्ते वरिष्ट विद्यूत अभियंता पी.के.भंज यांच्या उपस्थितीत एस.डी.बोरनारे आणि एस.पी.खैरे यांना प्रमाणपत्र आणि रोख बक्षिस देवून सन्मानित करण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@