ज्येष्ठ तमिळ नेते नटराजन मरुथप्पा यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2018
Total Views |




चेन्नई : बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी सध्या तुरुंगामध्ये असलेल्या ऑल इंडिया अण्णा द्रमुक पक्षाच्या नेत्या शशिकला नटराजन यांचे पती नटराजन मारुथप्पा यांचे आज पहाटे निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. 'मल्टीपल ऑर्गन फेल्युअर'मुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. दरम्यान आज सकाळी त्यांचे पार्थिव त्याच्या निवासस्थांनी आणले गेले.
 
 
नटराजन यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून अत्यंत चिंताजनक होती. छातीमध्ये जंतूसंसर्ग झाल्यामुळे १६ मार्चला त्यांना चेन्नईतील ग्लेनईगल्स ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शण्मुग प्रियान यांनी नटराजन यांच्या मृत्यूविषयी सांगितले. नटराजन यांना बरे करण्यासाठी आम्ही सर्वप्रकारचे प्रयत्न केले परंतु त्यामध्ये आम्हाला यश आले नाही याचे आम्हाला दु:ख असून ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, अशी प्रार्थना आम्ही करतो असे प्रियान यावेळी म्हणाले. यानंतर नटराजन यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी पाठवण्यात आले.

 
नटराजन यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नटराजन यांच्या पत्नी शशिकला या तुरुंगात असल्यामुळे त्या अंत्यसंस्कार विधीला उपस्थित राहणार का ? या विषयी थोडी साशंकता व्यक्त केली जात आहे. परंतु टीटीव्ही दिनकरन आणि शशिकला यांचे समर्थकांना त्यांना यावेळी घेऊन येतील, असा विश्वास काही जण व्यक्त करत आहेत.

@@AUTHORINFO_V1@@