शेतमालास दीडपट हमीभाव हवा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2018
Total Views |

शेतकर्‍यांची मागणी; अन्यथा राज्यभरात आंदोलन

जळगाव :
स्वामीनाथन आयोगात म्हटल्याप्रमाणे शेतकर्‍यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा म्हणजे दीडपट हमीभाव देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करुन सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला.
 
 
शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले. स्वामीनाथन आयोगात म्हटल्याप्रमाणे शेतकर्‍यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा म्हणजे दीडपट हमीभाव देण्यात यावा, शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, दूधाला ५० रुपये लीटर भाव मिळावा, संपूर्ण वीजबिल माफ व्हावे आदी मागण्या शेतकरी, शेतकर्‍यांची मुले व शेतकरी आंदोलनास पाठिंबा देणार्‍यांकडून करण्यात आल्या आहेत.
 
 
आंदोलनात प्रतिभा शिंदे, कल्पिता पाटील, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, मुकूंद सपकाळे, सचिन धांडे आदींसह सहकारी उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@