पुढील महापौर शिवसेनेचाच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2018
Total Views |

सुरेशदादांना विश्‍वास

 
 
जळगाव :
महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत सेना आणि भाजपची युती होण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे मात्र, यानंतरही जर युती न झाल्यास जळगाव महापालिकेत पुढील महापौर हा शिवसेनेचाच राहील, असा ठाम विश्‍वास माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी व्यक्त केला. मनपा पोटनिवडणुकीसंदर्भात जैन यांच्या ७, शिवाजीनगर या निवासस्थानी बैठक झाली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
 
 
प्रभाग क्रमांक २६ मधील भाजपचे नगरसेवक विजय गेही यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी ६ एप्रिल रोजी निवडणूक होत आहे. यासाठी शिवसेना उमेदवाराच्या निश्चितीबाबत चर्चा करण्यासाठी सुरेशदादांच्या निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी शिवसेनेचे माजी आमदार आर. ओ. पाटील, महापौर ललित कोल्हे, माजी उपमहापौर सुनील महाजन, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, नगरसेवक जितेंद्र मुंदडा उपस्थित होते.
 
गेहींच्या परिवाराविरोधात उमेदवार नाही
दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत आशा कोल्हे यांच्या विरोधात भाजपने उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे प्रभाग २६ मधील विजय गेही यांच्या रिक्त झालेल्या जागेवर उमेदवार देण्यात येऊ, नये अशी विनंती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. त्यामुळे गेही यांच्या कुटुंबातील सदस्य भाजपचा उमेदवार राहिल्यास त्याच्या विरोधात शिवसेनेकडून उमेदवार दिला जाणार नाही, असा निर्णय बैठकीत घेतला असल्याची माहिती सुरेशदादांनी पत्रकारांना दिली.
 
 
शिवसेनेकडून एबी फॉर्म
दरम्यान, अन्य एका सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार या जागेसाठी नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम मुदत २० मार्च आहे. भाजपने शब्द न पाळल्यास शिवसेनाही आपला उमेदवार देणार आहे. त्या दृष्टीने तयारी करण्यात आली आहे. नीरज जेसवानी व राहुल कुकरेजा हे दोघे शिवसेनेकडून इच्छूक आहेत किंवा ऐनवेळी अन्य उमेदवार उभा करून त्याला शिवसेनेचा एबी फॉर्म दिला जाऊ शकतो. त्यामुळे भाजप आपला शब्द पाळेल, अशी अपेक्षा असल्याचे सूत्राने सांगितले.
 

दोन महिने अगोदर उमेदवारांची घोषणा - युती न झाल्यास शिवसेना स्वतंत्र लढणार आहे. शिवसेनेकडून निवडणुकीच्या दोन महिने आधी सर्व उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे. यानंतर ज्यांना विरोध करायचा असेल त्यांनी विरोध करावा किंवा निवडणूक लढवावी, असे आव्हान सुरेशदादांनी दिले आहे.

@@AUTHORINFO_V1@@