शिक्षकांचे वेतन येत्या तीन दिवसांत, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2018
Total Views |
 
 
 
मुंबई : शिक्षकांच्या वेतनाबाबतत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला असून त्यामुळे उरलेली प्रक्रिया पूर्ण करुन शिक्षकांचे वेतन येत्या तीन दिवसांत देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे शालेय, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली.
 
विधानभवन येथे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना विनोद तावडे म्हणाले की, शिक्षकांच्या वेतनाबाबतत मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर या प्रकरणी राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेण्यात आला. त्यानंतर अनेक शिक्षकांच्या खातेबदलाची प्रक्रिया सुरु करण्यात आली. या प्रक्रियेला स्वाभाविकपणे काही कालावधी लागणार होता. या प्रक्रियेमुळे पाडव्याच्या दिवशी शिक्षकांचे वेतन होऊ शकले नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच, या विलंबाबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो, असेही तावडे यांनी सांगितले. शिक्षकांच्या वेतनाबाबतची प्रक्रिया सुरु असून, येत्या तीन दिवसांत शिक्षकांचे वेतन होईल, असे विनोद तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्व प्रक्रियापूर्ण व्हायला २०-२५ दिवस लागतात, त्यामुळे जुन्याच मुंबई बँकमधून वेतन केवळ या महिन्यापुरते काढावे, असे शिक्षण विभागाचे म्हणणे होते. परंतु, शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या हट्टापायी शिक्षकांचे वेतन होऊ शकले नाही, असाही आरोप तावडे यांनी केला. तसेच, काही जणांचा हट्ट युनियन बँकेचा होता, त्यामुळे हा उशिर झाला ही वस्तुस्थिती असल्याचेही त्यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@