मोसुलमध्ये बेपत्ता झालेल्या भारतीयांची हत्या : सुषमा स्वराज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
नवी दिल्ली : इराकमधील मोसुल येथे बेपत्ता झालेल्या ३९ भारतीयांची हत्या करण्यात आली आहे अशी धक्कादायक बातमी आज परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. आज राज्यसभेत बोलताना त्यांनी वरील माहिती दिली आहे. मोसुलमध्ये एकूण ४० भारतीय कामानिमित्त गेले होते. यातील ३९ भारतीयांची हत्या करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
 
 
 
 
 
मोसुलमध्ये ४० भारतीय कामानिमित्त गेले असताना यातील ३९ भारतीय एक दिवस आयएसआयएस या दहशतवादी संघटनेच्या नजरेस पडले व यावेळी आयएसआयएसने या भारतीयांना आपल्या ताब्यात घेतले आणि काही दिवसांनी त्यांची हत्या केली अशी सविस्तर माहिती स्वराज यांनी यावेळी दिली. गेल्या कित्येक दिवसांपासून या भारतीयांचे डीएनए त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी जुळतात काय याची पाहणी केली जात होती. आता या पाहणीत ३९ भारतीयांचे डीएनए त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी जुळत असल्याने आज ही घोषणा मी करत आहे असेही स्वराज यावेळी म्हणाल्या.
 
 
 
या सगळ्या प्रक्रियेमध्ये इराकच्या सरकारने आम्हाला खूप मदत केली तसेच या ३९ भारतीय नागरिकांच्या शवला भारतात आणण्यासाठी देखील ते आपल्याला मदत करीत आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. या ३९ भारतीय नागरिकांच्या मृतदेहांना भारतात आणल्यावर त्यांच्या नातेवाईकांना ते सुपूर्द केले जातील. या मृतदेहांची पूर्ण शहानिशा करून, त्यांच्यासोबत त्याबाबत डीएनए प्रमाणपत्र जोडून संपूर्ण सन्मानाने त्यांना आणले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@