जळगावात पावसाचा शिडकावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2018
Total Views |
 

उत्तर भागात निर्माण झाली चक्रीवादळसदृष्य परिस्थिती


 
जळगाव :
जळगाव शहरात गेल्या दोन दिवसांपासून ऊन सावलीचा खेळ सुरु आहे. सकाळी ढगाळ वातावरण तर दुपारी उन्हाचा चटका, असे संमिश्र वातावरण पाहावयास मिळत आहे. सोमवारी सायंकाळी शहरात जोरदार वारे वाहण्यासह पावसाचा शिडकावा झाला.
 
 
उत्तर भागात तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जळगावसह मध्य महाराष्ट्रात असे वातावरण निर्माण झाले आहे. ही परिस्थिती अजून आठवडभर राहणार असून, येत्या दोन दिवसात शहरात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, अशी माहिती भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ज्ञ एस. जी. कांबळे यांनी ‘तरूण भारत’ला दिली.
 
 
उत्तर भागात तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने या ठिकाणी चक्रीवादळ सदृष्य परिस्थिती झाली आहे.
हे वारे वेगाने मध्य महाराष्ट्राकडे वाहत असल्याने जळगावसह मध्य महाराष्ट्रात मिश्र वातावरण निर्माण झाले आहे. हे वातावरण पावसासाठी योग्य असल्याने येत्या दोन दिवसांत जळगावला विजांच्या कडकडासह पाऊस होईल, असा अंदाजही भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.
 

येत्या आठवड्यातील कमाल तापमान - २० मार्चः ३६.० (विजांच्या गडगडासह पाऊस), २१ मार्चः ३५.० (ढगाळ वातावरण), २२ मार्चः ३४.० (ढगाळ वातावरण), २३ मार्चः ३८.० (ढगाळ वातावरण), २४ मार्चः ३८.० (ढगाळ वातावरण), २५ मार्चः ४० (ढगाळ वातावरण).

 
 
@@AUTHORINFO_V1@@