रावेर उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव शासनाला सादर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2018
Total Views |

 

शल्यचिकित्सकांची सर्व रोगनिदान शिबिरात माहिती


रावेर :
रावेर येथील रुग्णसंख्या लक्षात घेता या ठिकाणी १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होण्याची गरज आहे. तसा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.
 
 
येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित सर्व रोगनिदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील होत्या. याप्रसंगी सभापती माधुरी नेमाडे, उपसभापती अनिता चौधरी, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, पं.स. सदस्य योगिता वानखेडे, रुग्ण कल्याण समितीचे पद्माकर महाजन, दीपक नगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.बी. बारेला यांनी केले. यावेळी दीपक नगरे यांनी रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्यासह कर्मचारी संख्या वाढविण्याची मागणी केली.
 
 
शिबिरात पहिल्या दिवशी ५२० रुग्णांची तपासणी करण्यात येऊन ३६ पेक्षा अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यशस्वीतेसाठी डॉ.संदीप चौधरी, डॉ.संदीप पाटील, डॉ.मनोज पाटील, डॉ.नरेंद्र पाटील, डॉ.गुरुदत्त वाघ, डॉ.चंद्रदीप पाटील, डॉ.मोहिनी तायडे, डॉ.पूनम भोगे, डॉ.आरती काळसकर, डॉ.रिजवाना शेख, डॉ.तोडकर, डॉ.प्रशांत पाटील, अधिपरिचारीका कल्पना नगरे, मंगला वळवी, लता कोल्हे, पूनम चौधरी, अर्चना पाटील, कार्यालय अधीक्षक वाय.टी. महाजन यांनी परिश्रम घेतले. सूत्र संचालन प्रदीप काळे यांनी तर आभार डॉ.दीपक सोलंकी यांनी मानले.
 
@@AUTHORINFO_V1@@