मनपा आयुक्त तुकाराम मुंढे आज अंदाजपत्रक मांडणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
नाशिक : महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे आज दुपारी २ वाजता होणार्‍या महासभेत सादर करणार आहेत.
 
महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक माजी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी तयार केले होते. मात्र, अभिषेक कृष्ण यांची बदली झाली आणि त्यांच्या जागेवर पदभार स्वीकारणार्‍या तुकाराम मुंढे यांनी अंदाजपत्रकाची नव्याने जुळणी करण्याचा निर्णय घेतला.
 
अभिषेक कृष्ण १४५१ कोटी रुपयांचे सुधारित आणि १४७५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करणार होते. त्यात त्यांनी घरपट्टीत १४ टक्के तर पाणीपट्टीत ५ टक्के दरवाढ प्रस्तावित केलेली होती. याशिवाय, सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात भांडवली कामांसाठी फारसा वाव राहणार नसल्याचे सूतोवाच करत प्रलंबित कामांनाच गती देण्याचा मनोदय बोलून दाखविला होता. मात्र, तुकाराम मुंढे यांनी अंदाजपत्रक नव्याने सादर करण्याचा निर्णय घेतला आणि तयारी केली होती.
 
@@AUTHORINFO_V1@@