आजही अविश्वास प्रस्ताव सादर झाला नाही, संसदेचे कामकाज तहकूब

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2018
Total Views |
 
 
नवी दिल्ली : तेलगु देसम पक्ष आणि वायआरएस काँग्रेस पक्षाला केंद्र सरकारच्या विरोधात संसदेत आजही अविश्वास प्रस्ताव सादर करता आला नाही. आज संसदेत विविध मागण्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज ठप्प झाले. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आधी दुपारी १२ वाजेपर्यंत आणि त्यानंतर संपूर्ण दिवसासाठी कमकाज तहकूब केले.
 
 
एका बाजूला तेलगु देसम पक्ष आणि वायआरएस काँग्रेस पक्षाने 'आम्हाला न्याय हवा' अशा घोषणा देत गदारोळ केला, तर दुसऱ्या बाजूला ऑल इंडिया अण्णा द्रमुक पक्षाने तेलंगणा राष्ट्र समिती आणि कावेरी जलप्रबंधन बोर्डाच्या निर्मितीची मागणी करत गोंधळ घातला. अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात यावा यासाठी तेलगु देसम पक्षाच्या खासदारांनी हातात फलक घेत हौद्यात धाव घेतली.
 
 
 
या विषयावर चर्चा करण्यासाठी सरकार तयार होते, मात्र विरोधकांच्या गदारोळामुळे चर्चा होवू शकली नाही, अशी भूमिका सरकारने घेतली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या सत्रात सतत कामकाज ठप्प होत असल्याने सरकार नाराज आहे. ११ दिवशी देखील संसदेचे कामकाज तहकूब करावे लागले आहे. मात्र आता पुढे अविश्वास प्रस्तावासंदर्भात काय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@