ओडिसामध्ये भारतीय वायुसेनेचे हॉक विमान कोसळले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
ओडिसा : भारतीय वायुसेनेचे प्रशिक्षक जेट विमान आज ओडिशा-झारखंड सीमेजवळील पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील माहुलदांगरी गावात कोसळले. या दूर्घटनेमध्ये या विमानातील वैमानिक गंभीर जखमी झाला असून त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
 
खरागपुरमधील कलाईकुंडा वायुसेना स्थानकातून या हॉक ट्रेनर विमानाने उड्डाण केले होते. त्यानंतर दुपारी १२.४५ वाजेच्या दरम्यान ओडिसा- झारखंड सीमेवर स्वर्णरेखा नदीजवळ हे विमान कोसळले.
 
 
या दूर्घटनेमध्ये प्रसंगावधान राखत वैमानिक बाहेर पडण्यात यशस्वी झाला आहे, मात्र जखमी अवस्थेमुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या विमान दूर्घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून दूर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@