बोंडअळीपासून कपाशीच्या संरक्षणासाठी मार्गदर्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2018
Total Views |

‘ऍग्रोस्टार’तर्फे चर्चासत्राला शेतकर्‍यांचा प्रतिसाद


जळगाव :
या वर्षीपासून नॉन बीटी बियाणे बीटी बियाणांमध्ये मिसळून देण्यात येणार असल्याने ते पेरल्यावर बोंड अळीचा प्रादुर्भाव खूपच कमी होईल. यादृष्टिने यावर्षी कृषी विभागातील अधिकार्‍यांनी लागवड होण्यापूर्वी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले.
 
 
शेतकर्‍यांना विविध प्रकारचा कृषी सल्ला आणि माहिती देणार्‍या ऍपची निर्मिती करणार्‍या ‘ऍग्रोस्टार’ या कृषी कंपनीने शेतकर्‍यांना शेती संदर्भातील आधुनिक प्रवाहांची माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या विविध अडचणी जाणून घेण्यासाठी आयोजित केलेल्या चर्चासत्रप्रसंगी ते बोलत होते. शेतकर्‍यांनी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून घ्यायला हवा. यासाठी वेगवेगळी मोबाईल ऍप्लीकेशन उपयुक्त ठरत आहे, असे सांगून ते म्हणाले, गेल्या दोन वर्षांमध्ये मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. ते नव्या तंत्राने टाळता येवू शकेल. ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक शिवाजी आमले तसेच जैन इरिगेशनचे बी.डी. जडे यांनीही शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.
 
 
ऍग्रोस्टारतर्फे कृषीतज्ज्ञ तेजस कोल्हे यांनी ऍग्रोस्टारच्या सर्व पिकांसाठी असलेल्या गोल्ड ट्रीटमेंटविषयी माहिती दिली. ऍग्रोस्टार कापूस बंपर धमाका २०१७ मध्ये सोडत पद्धतीने पैठण येथील कल्याण राधाकिशन सरोदे व गोरखनाथ बाजीराव गवळी या भाग्यवान विजेत्यांना अनुक्रमे जर्मन तंत्रज्ञानावर आधारित डॉईज-फार कंपनीचा ट्रॅक्टर व किसान क्राफ्ट कंपनीचे टिलर मोफत वितरीत करण्यात आले.
 
 
कार्यक्रमासाठी डॉईज-फार कंपनीचे मार्शेलो परसोनेनी, अंकुश पाटील, ऍग्रोस्टारचे बिझीनेस हेड रितेश अल्लडवार, महेश हौल, कृषी उपसंचालक अनिल भोकरे व वैभव सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.
 
@@AUTHORINFO_V1@@