फुले मार्केट शंभर टक्के बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2018
Total Views |

बाजारपेठेत कमालीचा शुकशुकाट
विराट मोर्चामध्ये सिंधी महिलांचाही मोठ्या संख्येने सहभाग

 

जळगावः
गाळेधारकांना अवाजवी भाडे व दंडाची आकारणी, दुकानांच्या ई-लिलावासाठी अन्यायकारक नियमांची अंमलबजावणी होत असल्याच्या निषेधार्थ मनपाच्या २० मार्केटमधील २ हजार ८१८ गाळेधारकांनी मंगळवार दि. २० मार्चपासून बेमुदत बंद पाळण्यास सुरुवात केली. त्यात शहरातील २० मार्केटपैकी एक असलेल्या फुले मार्केटमधील सर्व दुकाने पूर्णःत बंद असल्याने तेथे कमालीचा शुकशुकाट दिसत होता.
 
 
विविध वस्तू मिळण्याचे एकमेव ठिकाण हे मार्केट असल्याने खरेदीसाठी ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. एरवी गजबलेल्या फुले मार्केटमध्ये बंदमुळे निरव शांतता पहावयास मिळाली. या बंदमुळे ग्रामीण भागातून खरेदीसाठी आलेल्या काही महिलांची गैरसोय देखील झाली.
 

सिंधी समाजातील महिला पहिल्यांदा मोर्चात सहभागी - गाळ्यांच्या लिलावासंदर्भात सिंधी समाजातील व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाला होता. त्यासोबत सिंधी समाजातील महिलांही मोठ्या संख्येने सहभागी होत्या. एरवी विविध कार्यक्रमात, सामाजिक उपक्रमात सहभागी होणार्‍या सिंधी समाजातील पुरुषांच्या बरोबरीने असलेली चार भिंतीआड कायम राहणार्‍या महिलांची संख्या लक्षणीय होती. त्या पहिल्यांदाच अशाप्रकारच्या मोर्चात सहभागी झाल्याचे आश्‍चर्यकारक दृष्य पहावयास मिळाले.

 
मुख्य प्रवेशद्वार बंदच
घाणेकर चौकाच्या समोरील बाजूस असलेले फुले मार्केटचे लोखंडी मुख्य प्रवेशद्वार बंद केलेले होते. काही नागरिकांना याची कल्पना नसल्याने ते काही वेळ मार्केेटच्या बाहेरील बाजूला थांबून बंदविषयी विचारणा करत असल्याचे चित्रही दिसून आले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@