वादळी वार्‍यांमुळे वीजपुरवठा खंडित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2018
Total Views |

जळगाव :
जळगाव जिल्ह्यात सोमवारी सायंकाळनंतर जोरदार वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे, तसेच वादळाने अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. जळगावच्या एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात वीज यंत्रणेचे नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंते त्याची दुरुस्ती केली जात होती.
 
 
जळगावात रात्री साडेआठच्या सुमारास वादळ आणि विजेच्या चमचमाटासह अर्धा तास जोरदार पाऊस झाला. धरणगाव, जामनेर, शेंदुर्णी, पाचोरा, अमळनेरातही पाऊस झाला. वादळामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. ग्रामीण भागात ठिकठिकाणी जनावरांचे गोठे आणि घरांचे पत्रे उडून गेली. सुदैवाने कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नव्हते. या अवकाळी पावसाने जनावरांचा कडबा आणि चार्‍याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 
 
वादळामुळे वीज यंत्रणेचे मोठे नुकसान होऊन अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. रात्री उशिरापर्यंत त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. जळगाव एमआयडीसीच्या ई सेक्टरमध्ये १३ वीज वाहिन्यांचे नुकसान झाले. तसेच शिवाजीनगरमध्ये डीपी-ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाला. त्याची दुरुस्ती मंगळवारी सकाळी करण्यात येणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@