शेअर बाजारावर राजकीय अनिश्‍चिततेचे सावट, घसरणीची शक्यता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2018
Total Views |

 

भाजपला येणार मोठ्या आव्हानांना तोड देण्याची वेळ !

 
घसरणी हीच दर्जेदार शेअर्स कमी भावात खरेदी करण्याची सुवर्णसंधी
यंदाचा उन्हाळा उष्णतेचा कहर करणारा ठरणार?
देशात प्रत्येक बाबतीत लायसन्स राज
 
देशांतर्गत शेअर बाजारासाठी राजकीय अनिश्‍चितता ही सर्वात मोठी चिंतेची बाब ठरणारी आहे. त्याला अमेरिकेने सुरु केलेल्या व्यापार युद्धा(ट्रेड वॉर)ची जोड मिळाली आहे. त्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होणार आहे. उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांच्या निकालांमुळे राजकारणाला लागलेल्या वळणावरुन देशातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला आगामी काळात मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. भाजपवर काही राज्यातून चांगल्या तर काहींमधून वाईट बातम्यांना तोंड देण्याचीही वेळ येणार आहे.
 
 
तज्ञांच्या म्हणण्यानुसार या राजकीय अनिश्‍चिततेमुळे म्युच्युअल फंडांकडून मोठ्या प्रमाणावर विक्री होण्याची शक्यता असल्याने बाजारावरील दबाव वाढणार आहे. त्यामुळे आगामी एक ते दीड वर्षात तरी बाजारात लहानमोठे चढउतार होतील. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीनंतरच बाजारात स्थिरता पाहावयास मिळणार आहे. सध्या तयार केलेल्या पोर्टफोलिओतील शेअर्समधून चांगला परतावा तेव्हाच मिळण्याची शक्यताही तज्ञांनी व्यक्त केली आहे.
 
 
काही तज्ञांच्या मतानुसार येत्या कर्नाटक विधानसभा निवडणूक भाजपाने गमविली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निेर्देशांक (निफ्टी) ९५०० बिंदूंच्याही खाली गडगडण्याची शक्यता राहील. नेमक्या याच काळात ट्रेड वॉर तापल्यास बाजारात आणखी मोठी घसरण होऊ शकते. पण या घसरणीत अनेक दर्जेदार शेअर्स कमी भावात खरेदी करण्याची चांगली संधी मिळणार आहे. हे शेअर्स नंतरच्या काळात वाढून गुंतवणुकदारांना मोठा फायदा मिळू शकतो.
 
 
मार्च महिन्यातच मेच्या उन्हाळ्याची चुणूक पाहावयास मिळू लागली आहे. हवामान विभागाच्या अनुमानानुसार तापमापीतला पारा आणखी वर जाणार आहे. होळीनंतर हरियाणा, पंजाब राजस्थानसह संपूर्ण उत्तर भारतातच थंडी समाप्त होऊन तीव्र उन्हाळ्याचे चटके आजच बसू लागले आहेेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या वर्षाचा उन्हाळा गेल्या अर्धशतकातील उष्णतेचा कहर करणारा व तापमान मागील सर्व विक्रम मोडणारे ठरण्याची शक्यता आहे.
 
 
हवामानाचा आतापर्यंतचा रिवाज पाहिल्यास ते कमाल २९ अंश सेल्सिअसपर्यंत जात असते. पण आताच ते ३२ अंशापर्यत चढलेले आहे. या मार्चमध्ये अनेकदा अंदाज वर्तवूनही फारसा पाऊस पडलेला नाही. फक्त थेंबभर पावसाने तेवढी हजेरी लावलेली आहे. वस्तुत: या पंधरवड्यात चांगला पाऊस पडत असतो. मार्चअखेरीस तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते.
 
 
हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा कमाल तापमान सरासरीपेक्षा एका अंश सेल्सिअसने जास्त राहू शकते. पण उन्हाळ्याच्या चटक्यांपासून दिलासा कशा प्रकारे मिळणार ते मात्र हवामान विभाग सांगू शकत नाही. असे असले तरी या दिलासा देणार्‍या मान्सूनचे आगमन केव्हा होणार याची औपचारिक घोषणा येत्या १५ एप्रिलनंतरच केली जाऊ शकते.
 
 
भारताने आर्थिक प्रगतीच्या बाबतीत बरीच मजल गाठलेली असली तरी संपत्तीचे समन्यायी याटप मात्र अजूनपर्यंत झालेले नाही. जागतिक स्तरावरही चीन हा त्याच्या प्रचंड आर्थिक प्रगतीमुळे श्रीमंत देश बनण्याच्या मार्गावर आलेला आहे. भारताच्या बाबतीत मात्र तो अजूनही तसा ‘गरीब’च देश म्हटला पाहिजे. फक्त तो पूर्वीपेक्षाही ‘कमी गरीब’झालेला आहे!
 
 
भारत हा जपानला मागे टाकून सर्वात जास्त क्रयशक्ती (परचेसिंग पॉवर) असलेला देश बनलेला आहे. याबरोबरच देशाची अर्थव्यवस्था चीन व अमेरिकेपेक्षाही पिछाडीवर असली तरी युरोपातील कोणत्याही देशापेक्षा मोठी अर्थव्यवस्था असलेला देशही झालेला आहे.
 
 
तरीही भारतात सरकारचा अर्थव्यवस्थेवर मोठा दबाव आहे. देशात प्रत्येक बाबतीत ‘लायसन्स राज’ असून नोकरशाहीच्या लाल फितीचा विळखा विकास कामांना बसलेला आहे. नोकरशाहीची पकड पूर्णपणे ढिली होऊ शकत नसली तरी सध्या ती थोडी सैल झालेली आहे. भारतात व्यापार करणे सुलभ झाले आहे. याबाबतीत भारताने १४८ व्या स्थानावरुन १०० व्या स्थानावर झेप घेतलेली आहे.
 
 
२०१४ पासून देशातून आतापर्यंत २३ हजार कोट्याधिशांनी विदेशात स्थलांतर केले असून ती एक चिंतेची बाब ठरली आहे. विदेशीबरोबरच देशातर्ंगत गुंतवणुकही गरजेची आहे. अमेरिकेने सुरु केलेले ट्रेड वॉर नुकसानीचे आहे. अमेरिकेच्या प्रहार यादी(हिट लिस्ट)वर चीन, भारत, थायलंड अर्जेंटिना व ब्राझिल हे देश आहेत.
 

सेन्सेक्स ३२ हजारांखाली, निफ्टी १० हजार १०० पेक्षा कमी - शेअर बाजारावरील मंदीच्या अस्वलांची पकड अजूनही कमी झाली नसल्याचे आज सोमवारी १९ रोजी दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक (सेन्सेक्स) दिवसअखेरीस ३२ हजार ९२३ म्हणजेच ३३ हजार बिंदूंच्या मानसशास्त्रीय पातळी(सायकॉलॉजिकल लेव्हल)च्याही खाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) देखील १० हजार १०० बिंदूंपेक्षाही कमी म्हणजे १० हजार ९४ बिंदूंवर बंद झाला. तज्ञांच्या म्हणण्यानुसार आगामी काळात राजकीय अनिश्‍चिततेचा परिणाम बाजारावर होऊ शकतो. या वर्षातील अनेक राज्यांचा विधानसभा विवडणुका व बरोबर एका वर्षाने होणारी लोकसभा निवडणूक पाहता शेअर बाजारातील अस्थिरता कायम राहणार असल्याचेही तज्ञांचे मत आहे.

@@AUTHORINFO_V1@@