कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तीन महिन्यात मार्गी लावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2018
Total Views |

मुख्यमंत्र्यांचे आदेश, मुख्य सचिवांची समिती घेणार आढावा

 

 
 
 
मुंबई : महाराष्ट्राचा मानबिंदू समजला जाणारा कोयना जलविद्युत प्रकल्प पूर्ण होऊन ५० वर्षे झाली तरी सुमारे ३२०० विस्थापितांचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन येत्या तीन महिन्यात मार्गी लावावे, असे आदेश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
 
विधानभवन येथे आयोजित विशेष बैठकीत कोयनेसह धोम, कणेर, वांग, मराडवाडी आणि गुंजवणी येथील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. या बैठकीला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शंभूराजे देसाई, मनीषा चौधरी, भारत पाटणकर, तसेच अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
 
कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत मुख्यमंत्र्यांनी सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या नेतृत्वखाली एक टास्क फोर्स बनवण्यासह येत्या तीन महिन्यात पुनर्वसनाचे तपशील ठरवण्याचे व सर्व आकडेवारीसह प्रकल्पग्रस्तांची एकूण संख्या आणि सरकारवर पडणारा भार याचा अहवाल तयार करण्याचे आदेश दिले. तसेच, २०१९ पूर्वी कोयनेसह धोम, कणेर, वांग आणि मराडवाडी आणि गुंजवणी येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण झालेले असले पाहिजे, असेही आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी प्रशासनाला दिले.
 
@@AUTHORINFO_V1@@