बियांचे वाटप करून वाढदिवस साजरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2018
Total Views |

 

मैथिलीच्या वाढदिवशी पवनीकर कुटुंबाचा आदर्श उपक्रम


 
जळगाव :
प. न. लुंकड कन्या शाळेतील इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी मैथिली पवनीकर हिचा १३ वा वाढदिवस तिच्या कुटुंबीयांनी आगळ्यावेगळा उपक्रम राबवून साजरा केला. तिच्या वर्गमैत्रिणींना भेटवस्तू म्हणून बियांचे वाटप करीत पर्यावरण जपण्याचा संदेश देण्यात आला.
 
 
पवनीकर कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे शाळेचे पर्यवेक्षक गणेश महाजन यांनी कौतुक केले. मुलींनी या बियांची लागवड करावी. यानिमित्त झाडाचे संगोपन करण्याची संधी मिळेल. याचे अनुकरण इतरांनीही करावे, असे सांगून शाळेत गेल्या अनेक वर्षापासून सीड बँकेचा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
 
 
मैथिलीची आई डॉ. मंजुषा पवनीकर यांनी या उपक्रमाची माहिती सांगितली. याप्रसंगी वडील पंकज पवनीकर, बहीण संस्कृती व वर्गशिक्षिका मेघा जोशी व विद्यार्थिनी आदी उपस्थित होते.
 

हितचिंतकांकडून जमा केल्या बिया - पवनीकर कुटुंबाने या सर्व बिया हितचिंतक व मित्र परिवाराकडून जमा केल्या, तर काही विकतही घेतल्या. बियांमध्ये फूल, भाज्या व फळे यांचा समावेश आहे. या बियांची ६० विद्यार्थिनी आपापल्या घरी लागवड करून संगोपन करतील. यानिमित्ताने मैथिलीची आठवण त्यांना सतत होत राहील, तसेच पर्यावरणाची सेवाही त्यांच्या हातून घडेल अशी माहिती पवनीकर यांनी दिली.

 
@@AUTHORINFO_V1@@