भाजपचे आ. सुरेश भोळे राजीनाम्याच्या तयारीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2018
Total Views |

 
जळगाव :
मनपा मार्केटमधील गाळेधारकांचा प्रश्‍न मार्गी लागून त्यांना न्याय मिळणे महत्त्वाचे आहे. यासाठी मला राजीनामा द्यावा लागला तरी चालेल, अशा शब्दात आ. सुरेश भोळे यांनी गाळेधारकांच्या पाठिशी असल्याचे ठणकावून सांगितले.
 
 
गाळेधारकांच्या कोअर कमिटीचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी गाळेप्रश्‍नी आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन केले होते. त्यास उत्तर देताना आ. भोळे यांनी राजीनामा देण्यास केव्हाही तयार आहे. गाळेधारकांच्या हातात राजीनामा देतो. राजीनामा क्षुल्लक विषय आहे. प्रश्‍न सुटणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तसेच मनपा व शासन मिळून प्रश्‍न सोडवावा लागेल. पाचपट दंडाचा ठराव रद्द करावा लागेल. गाळेधारकांसाठी कुणाकडेही जाण्यास आपल्याला कमीपणा वाटणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@