अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीचे वय ६० वरून ६५ करण्याचा निर्णय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या सेवानिवृत्तीचे वय ६० वरून पुन्हा एकदा ६५ वर्षे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत याबाबत घोषणा केली.
 
सरकारने अंगणवाडी सेविकांच्या सेवानिवृत्तीचे वय ६५ वरून ६० करण्याचा निर्णय घेतला होता. सेविकांचे वय व त्यानुसार कामावर होऊ शकणारा परिणाम लक्षात घेता नव्या व्यक्तींना संधी मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, हे वय ६५ करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती. त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीचे वय ६५ करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
मात्र, त्याकरिता आरोग्य प्रमाणपत्र असणे बंधनकारक असणार आहे. तसेच, याकरिता डॉक्टरांची व्यवस्थाही सरकारकडूनच करण्यात येणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@