अन्नसुरक्षा योजनेतील वशिलेबाजी थांबवा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2018
Total Views |

अ.भा. ग्राहक पंचायतीचे एरंडोल तालुकाध्यक्ष नुरुद्दीन मुल्ला यांची मागणी


कासोदा, ता.एरंडोल :
अन्नसुरक्षा योजनेतील वशिलेबाजी थांबवावी तसेच उज्ज्वला गॅस योजना गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी शिल्लक राहिलेल्या लाभार्थ्यांची यादी त्वरित जाहीर करावी, या प्रमुख मागण्यांचे निवेदन नुकतेच अ.भा. ग्राहक पंचायतीचे एरंडोल तालुकाध्यक्ष नुरुद्दीन मुल्ला यांनी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना दिले.
 
 
एरंडोल येथे १५ मार्च रोजी जागतिक ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी अपर जिल्हाधिकारी गाडीलकर शहरात आले होते. त्यावेळी मुल्ला यांनी हे निवेदन दिले. अन्नसुरक्षा योजनेत लाभार्थी घेतांना ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ठराव केला जातो. अशा वेळी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या नातेवाईकांची व जवळच्या कार्यकर्त्यांची वशिलेबाजीने निवड करतात. त्यामुळे खरे लाभार्थी, ज्येष्ठ नागरिक, अपंग, विधवा, परितक्त्या हे लाभापासून वंचित राहतात. ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत कोणताही निकष लावला जात नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीचा अधिकार काढून तो पुरवठा खात्याला दिला पाहिजे. असे झाले तर खर्‍या लाभार्थींना लाभ मिळेल. तसेच उज्ज्वला गॅस योजनेत समाविष्ट असलेले लाभार्थीसुद्धा या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे शिल्लक राहिलेल्यांची यादी जाहीर करावी व नियमात बसणार्‍या लाभार्थ्यांचा समावेश करावा, असे निवेदनात नमूद केले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@