मसापच्या युवा साहित्य-नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. आशुतोष जावडेकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Mar-2018
Total Views |
 
 
 
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा इस्लामपूर यांच्या वतीने यंदाचे युवा साहित्य-नाट्य संमेलन रविवार दि. ११ मार्च २०१८ रोजी इस्लामपूरच्या लोकनेते राजारामबापू पाटील नाट्यगृहात होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखक, कवी, गायक आणि संगीतकार डॉ. आशुतोष जावडेकर यांची निवड करण्यात आली आहे. प्रतीक जयंतराव पाटील यांच्या हस्ते या संमेलनाचे उदघाटन होणार आहे. यावेळी परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, राजवर्धन जयवंतराव पाटील, राजारामबापू सहकारी बँक लिमिटेडचे चेअरमन श्यामराव पाटील, मसापच्या इस्लामपूर शाखेचे अध्यक्ष प्रा. प्रदीप पाटील, विभागीय संमेलनाचे निमंत्रक विनोद कुलकर्णी, सहनिमंत्रक राजन लाखे, तानसेन जगताप, वि. दा. पिंगळे, उपस्थित राहणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. 
प्रा. जोशी म्हणाले, 'युवकांच्या साहित्य आणि नाट्यक्षेत्रातील प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मसापतर्फे प्रतिवर्षी युवा साहित्य-नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. प्रतिभेच्या नव्या कवडशांचा शोध घेणे हाच या संमेलनाचा हेतू आहे. डॉ. जावडेकर हे तरुणपिढीचे आवडते लेखक, गायक आणि संगीतकार आहेत. तरुणाईच्या भावविश्वाशी निगडित विषय डॉ. जावडेकरांनी आपल्या लेखनातून हाताळले आहेत. त्यामुळे त्यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करताना परिषदेला आनंद होत आहे. 
 
 
 
'या संमेलनाची सुरुवात सॉक्रेटिस ते दाभोळकर पानसरे व्हाया तुकाराम या पथनाट्याच्या सादरीकरणाने होणार आहे त्यानंतर सहभागी युवक संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढणार आहेत. उदघाटन सत्राचा प्रारंभ नांदी आणि स्वागतगीताने होणार आहे. उदघाटन सत्रानंतर प्रसिद्ध कवी आणि गीतकार वैभव जोशी यांची मुलाखत रवी बावडेकर आणि मनाली जाधव घेणार आहेत. तिसऱ्या सत्रात भगवती क्रिएशन सांगली प्रस्तुत इरफान मुजावर लिखित आणि यशोधन गडकरी दिग्दर्शित 'तेरे मेरे सपने' या एकांकिकेचे सादरीकरण युवा कलाकार करणार आहेत. संमेलनाच्या समारोपापूर्वी प्रसिद्ध कवी रमजान मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित युवा कवींचे कवी संमेलन होणार आहे.  
 
@@AUTHORINFO_V1@@