जेव्हा मुख्यमंत्री जनतेत जाऊन होळी साजरी करतात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Mar-2018
Total Views |

 
गोरखपूर : होळी हा असा सण आहे, जो नेते, अभिनेते, प्रशासक, उद्योजक ते सामान्य माणूस सर्वांनाच भुरळ घालत असतो. प्रत्येक व्यक्ती आपल्या वैयक्तिक स्तरावर होळी साजरी करत असते. मात्र मोठ्या चेहऱ्यांनी सामान्य जनतेत येऊन होळी सारखा आनंदाचा सण साजरा करण्याचा योग दुर्मिळच असतो.
 
 
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे होळीच्या निमित्ताने आज आपल्या स्वगृही, म्हणजेच गोरखपूर येथे होते. त्यांनी गोरक्षनाथांची पूजा केल्यानंतर सार्वजनिक पद्धतीने होळी साजरी केली. गोरखपूरच्या रस्त्यावर एका छोट्या रॅलीचे आयोजन करून रस्त्यावर, त्यांच्या स्वागतासाठी उभ्या असलेल्या जनतेवर भरभरून रंग उधळला.
 
 
गोरखपूर येथील लोक देखील मुख्यमंत्र्यांसोबत होळी खेळण्याचा आनंद साजरा करत होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांची ही पहिलीच होळी होती, जी त्यांनी जनतेसोबत साजरी केली. दिवाळी देखील त्यांनी अयोध्या येथील जनतेसोबत साजरी केली होती. उत्तरप्रदेश जनतेत रमणारा हा मुख्यमंत्री उत्तरप्रदेशच्या लोकांचे प्रत्येक सणासोबत भरभरून प्रेम मिळवताना दिसत आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@