परिचारकांचे निलंबन मागे घेऊ नये

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Mar-2018
Total Views |

आमदार अॅड. अनिल परब यांची विधानपरिषदेत मागणी

  
 
 
 
मुंबई : अपक्ष आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेऊ नये, अशी मागणी अॅड. आमदार अनिल परब यांनी विधानपरिषदेत केली. बुधवारी विधानपरिषदेत ठराव करून आवाजी मतदानाच्या आधारे त्यांचे निलंबन मागे घेण्याची घोषणा सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली होती. मात्र, आता निलंबन मागे घेण्याच्या निर्णयाला शिवसेनेने विरोध केला आहे.
 
गेल्या वर्षी सोलापूरातील अपक्ष आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर वातावरण चांगलेच तापले होते. गेल्या अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यानंतर परिचारक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे दीड वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते, तसेच अधिक चौकशीसाठी समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीचा अहवाल बुधवारी अधिवेशनादरम्यान सादर करण्यात आला. या समितीने अहवाल सादर केल्याप्रमाणे त्यांचे निलंबन मागे घेण्यासाठी ठराव करण्यात आला. त्यानंतर आवाजी मतदानाद्वारे त्यांचे निलंबन मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. परंतु गुरूवारी शिवसेनेने त्यांचे निलंबन कायम ठेवण्याची मागणी सभापतींकडे केली. या मागणीनुसार सभापतींनी सदनाच्या सदस्यांनी परिचारकांचे निलंबन कायम ठेवण्यासाठी सूचना द्याव्यात, त्यावर ठराव मांडावा मग त्यावर विचार केला जाईल, असे निर्देश दिले.
 
@@AUTHORINFO_V1@@