पीएनबी घोटाळा : मुख्य लेखापरीक्षक सीबीआय कोठडीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Mar-2018
Total Views |

 
पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी सीबीआय ने काल १ मार्च रोजी निवृत्त मुख्य लेखापरीक्षक बिष्णूब्रत मिश्रा याला अटक केली होती. त्याला १४ मार्च पर्यंत सीबीआय कोठडीत राहण्याची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. २०११ ते २०१५ या काळात पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रेडी हाउस शाखेचा तो मुख्य लेखपरीक्षक म्हणून कार्यरत होता.
 
 
याचबरोबर विशेष सीबीआय न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित आणखी एका मुख्य लेखापरीक्षक मोहिंद्र कुमार शर्मा याला देखील अटक केली आहे. मेहुल चौकसी आणि निरव मोदी या दोघांच्या खात्यातील व्यवहार साशंक पद्धतीने हाताळले जात असल्याचा आरोप केला गेला आहे. त्यासाठी मोहिंद्र कुमार देखील जबाबदार असल्याचे पुरावे सीबीआयच्या हाती आले आहेत.
 
 
शर्मा आणि मिश्रा या दोघांना सीबीआय कोठडीत ठेवण्याची शिक्षा दिली गेली आहे. इतर अनेक अधिकाऱ्यांची चौकशी याबाबतीत सुरु आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@