आशिया मुष्टियोद्धा स्पर्धेत भारताची सुवर्ण कामगिरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
किर्गिस्तान : आशिया मुष्टियोद्धा स्पर्धेत भारताची मुष्टियोद्धा नवजोत कौर हिने महिला फ्रीस्टाईल गटामध्ये सुवर्ण पदकाची कामगिरी केली आहे. ६५ किलोग्रॅम गटामध्ये नवजोत हिने सुवर्ण पदक मिळवत भारताला या स्पर्धेमध्ये पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले आहे.  भारताला हे पदक मिळवून देणारी नवजोत कौर ही पहिली भारतीय महिला मुष्टियोद्धा ठरली  आहे. 
 
 
महिला गटात नवजोत हिने जपानच्या मिया इमाई हिला चक्क ९-१ अशा मोठ्या फरकाने मागे टाकले आहे. पहिल्या फेरीपासूनच नवजोत आक्रमक खेळत होती. नवजोतने सात अंक मिळविले तरी देखील इमाईच्या खात्यात एकही अंक नव्हता मात्र नवजोतच्या सातव्या अंकावर इमाई हिने एक अंक मिळवत या फेरीत तिचे खाते उघडले मात्र त्यानंतर नवजोतने इमाईला एकही अंक मिळवू न देता हा सामना आपल्या नावावर करून घेतला.
 
किर्गिस्तानमधील बिश्केक येथे ही स्पर्धा सुरु असून भारताने पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये सुवर्ण कामगिरी केली आहे. मुष्टियोद्धा विनेश फोगाटने देखील या स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळविले आहे. एकंदरीत या स्पर्धेत भारताने सहा पदक मिळविले असून एक सुवर्ण एक रौप्य आणि चार कांस्य पदक मिळविले आहेत. 
 
@@AUTHORINFO_V1@@